
मुंबई – चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी श्योमीने जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत २०१४मध्ये दुप्पट महसुली कामगिरी केल्याची माहिती या कंपनीचे अध्यक्ष जुन ली यांनी आपल्या ब्लॉगवर दिली असून, २०१४मध्ये कंपनीने ६.११ कोटी हँडसेट विक्री केली. २०१३मधील विक्रीच्या तुलनेत २२७ टक्क्यांची वाढ झाली. यातून १३५ टक्क्यांच्या वाढीसह १२.२ अब्ज डॉलरचा (७४.३ अब्ज युआन) महसूल कंपनीला मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी दुस-या तिमाहीत श्योमीने हँडसेट विक्रीमध्ये जागतिक बाजारपेठेतील अव्वल कोरियन कंपनी सॅमसंगला चीनमध्ये मागे टाकले. ली यांनी परदेशात अधिक विस्तारावर भर देण्याचा इरादा जाहीर केला आहे.
