
मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आठवड्याच्या सुरुवातीला वाढ झाली असून, बीएसई सेन्सेक्समध्ये आज सकाळी बाजार उघडताच २६५ अंकांची वाढ झाली. धातू, बांधकाम आणि वाहन उद्योगाच्या शेअर्समध्ये तेजी आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्समध्ये तेजी
बीएसई सेन्सेक्समध्ये मागच्या सत्रामध्ये ३३ अंकांची वाढ झाली होती. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६५ अंकांच्या वाढीसह सध्या २७,५०७ अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवरही बीएसई सेन्सेक्समधील वाढीचा सकारात्मक परिणाम झाला आहे. निफ्टी ७८ अंकांच्या वाढीसह सध्या ८२७९ अंकांवर आहे.
नाताळची सुट्टी असल्याने सध्या शेअर बाजारातील गुंवतणूक कमी झाली असली तरीही अन्य आशियाई शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण आहे. नववर्षाच्या पहिल्या आठवडयापासून पुन्हा बाजारात गुंतवणूकीचा ओघ वाढेल असे बाजार तज्ञांनी सांगितले.
