
नागपूर : राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केळकर समितीचा अहवाल सादर केला असून संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या अहवालावर मात्र पुढच्या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
विधानसभेत केळकर समितीचा अहवाल सादर
हा अहवाल प्रादेशिक असमतोल व विदर्भातील अन्यायावरील असून या अहवालात यासंदर्भात काही शिफारशी करण्यात आल्या आहेत. या अहवालातील कोणत्या शिफारशी स्वीकारायच्या याबाबतचा निर्णय सर्व पक्षीय गटनेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. या अहवालामुळे अधिवेशनात गदारोळ निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे अधिवेशन संपण्यास अवघा दीड दिवस असताना सरकारने हा अहवाल विधानसभेत सादर केला.
