विधानसभेने दिली मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला मंजुरी

devendra-fadnvis
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयक विधानसभेत आज सादर केले आणि ह्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. राज्य शासनाने मराठा आरक्षणाचे नवे विधेयक या पार्श्वभूमीवर सादर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विधेयकात सुधारणा करून नवे विधयेक विधानसभेत सादर केले. या विधेयकाला विधानसभेने मंजुरी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, आरक्षणाच्या मर्यादेच्या मुद्दय़ावर या निर्णयाला स्थगिती मिळाली. सेना-भाजपा सरकारने या पार्श्वभूमीवर नव्या विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे आता या आरक्षणाचे काय होणार, हा प्रश्न मार्गी लागणार का, याबाबत औत्सुक्य आहे.

Leave a Comment