
पुणे : पुण्याच्या धनकवडी परिसरातील तानाजी नगरमध्ये एका दहा वर्षांच्या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असून ही आत्महत्या केवळ जर्किनसाठी केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
धनकवडीत १० वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम व्यावसायिक सुनिल पिसाळ ह्यांच्या बहिणीचा काल वाढ दिवस असल्यामुळे पिसाळ कुटुंबीय जेवणासाठी हॉटेलमध्ये जात असता पिसाळ यांचा मुलगा आदित्यने जर्किंनसाठी हट्ट केला. मला नवीन जर्किन घेतले तरच मी बाहेर येर्इल असा हट्टा आदित्यने केला. त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर घरातील सर्वजण हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले. आदित्य घरी एकटाच होता. जर्किन न घेतल्याचा राग मनात धरून त्याने रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आज सकाळी संबंधित मुलांवर धनकवडीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
