विश्वचषक २०१५चा दूत होणार मास्टरब्लास्टर !

sachin
मुंबई : २०१५च्या वर्ल्डचषकामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जरी खेळणार नसला तरी, या विश्वचषकासाठी आयसीसीने सचिन तेंडुलकरची ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.

न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलियात १४ फेब्रुवारी २०१५ ते २९ मार्च २०१५ या दरम्यान क्रिकेट विश्वचषकाचे सामने खेळवले जातील. सचिनवर आयसीसीने या विश्वचषकाच्या प्रमोशनाची दबाबदारी जबाबदारी टाकली असून विश्वचषक सुरु होईपर्यंत आणि विश्वचषकादरम्यान सचिन आयसीसीच्या विविध कार्यक्रमांचे प्रमोशन करणार आहे.

आयसीसीने त्याची या पदासाठी निवड त्याची जगभरातली लोकप्रियता आणि त्याचे चाहते यांचा विचार करता केली असून क्रिकेटचे देव आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा गळ्यातला ताईद असलेल्या सचिनचा वापर क्रिकेटला अधिक लोकप्रिय करण्याचा आयसीसीचा मानस साल्यामुळे सचिनच्या रुपाने क्रिकेटचे प्रमोशन करण्यासाठी त्याची ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.

Leave a Comment