विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडेंचे नाव निश्चित

dhanjay-munde
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांचे नाव विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित करण्यात आले असून विधान परिषद सभापतींकडे मुंडे यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यांच्या नावाचा प्रस्ताव विधान परिषदेच्या सभापतींकडे सादर करण्यात येणार आहे. मुंडे हे तरूण, आक्रमक आणि अभ्यासू नेते असल्याने त्यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले.