
नगर – पोलिसांनी नगर जिल्हय़ातील बहुचर्चित जवखेडा हत्याकांड प्रकरणी संशयित अशोक जाधव याला अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जवखेडा प्रकरणी आणखी एकाला अटक
या प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या प्रशांत जाधव याचा अशोक हा सख्खा भाऊ असून पोलिसांना अशोकवर संशय होता. त्याची नार्को टेस्ट केल्यानंतर काल मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली. आज त्याला पाथर्डी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
२० ऑक्टोबरच्या मध्यरात्री दलित जाधव कुटुंबियांची जवखेडे-खालसा गावात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दिड महिन्यानंतर पोलिसांनी प्रशांत जाधव याला अटक केला. त्यानंतर रविवारी मध्यरात्री अशोक जाधवला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
