
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक प्रभात थिएटर बिल्डरला विकण्याचा सध्या तरी आपला कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण खुद्द थिएटरचे मालक अजय किबे यांनी आज दिले आहे.
‘प्रभात’ विकणार नाही – अजय किबे
विवेक दामले यांना प्रभात थिएटर हे भाडे करारावर चालविण्यासाठी देण्यात आले होते. दामले यांना आमच्याबरोबरचा करार संपुष्टा आल्यानंतर तो वाढवून घेण्यात अपयश आल्याने त्यांनी आमच्या बदनामीचा घाट घातल्याचा आरोप किबे यांनी केला आहे. थिएटर ताब्यात आल्यानंतर ते कसे चालवायचे किंवा या थिएटरचे काय करायचे, याचा निर्णय घेण्यात येईल. मात्र, सध्या थिएटर विकण्याचा आपला विचार नसल्याचे किबे यांनी सांगितले.
