
मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सलग घसरणीनंतर गुरुवारी सकाळच्या सत्रात जोरदार कमबॅक करत २७८ अंकाची उसळी घेतली तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही आठ हजार ६६२६.९५ च्या उच्चांकावर पोहचला.
तीन दिवसाच्या पडझडीनंतर निफ्टीचे कमबॅक
२७८.४१ अंकाची उसळी घेत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने २८ हजार ७२१.१२ चा टप्पा गाठला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८८९.३० अंकांची वाढ होत तो आठ हजार ६२६.९५ या नव्या शिखरावर पोहोचला. याआधी एक डिसेंबर रोजी निफ्टीने आठ हजार ६२३ या नव्या शिखराला स्पर्श केला होता.
