माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड अनंतात विलीन

gaikwad
कोल्हापूर – राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे मंगळवारी वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. गायकवाड यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता पंचगंगा स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे एक मुलगा मानसिंग आणि चार मुली असा परिवार आहे.

१९६५ मध्ये ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. ७२ व ७८ च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. १९७३ मध्ये वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्य़भार सांभाळला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला.