काँग्रेस ठोकणार विरोधी पक्षनेतेपदावर दावा

manikrao
मुंबई – सत्तेत सहभागी शिवसेना ही सहभागी होणार हे निश्चित झाल्यामुळे शिवसेनेनंतर सर्वात जास्त संख्याबळ विधानसभेत काँग्रेसचे आहे. अशा स्थितीत काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळाले पाहिजे, अशी मागणी केली. जर शिवसेना सत्तेत सहभागी होणार असेल, तर काँग्रेस या पदावर दावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना सत्तेत जाणार असेल, तर संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार नाही, हे स्पष्ट केल्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा काँग्रेसचा मार्ग मोकळा होणार आहे. हिवाळी अधिवेशनात याबाबत काँग्रेस दावा करेल, असे ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Comment