
मुंबई : भाजपकडून शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी सुरू असलेला खटाटोप यशस्वी झाला असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सत्ता सहभागासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्यामुळे अखेर हे सुत जुळलेच असे म्हणावे लागेल. त्यानुसार खातेवाटपाचा फॉम्यूलाही तयार करण्यात आला आहे. याबाबत आज अधिकृत घोषणा होणार आहे.
अखेर सुत जुळलेच….
सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवसेना-भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटपाचा फॉम्यूला तयार करण्यात आला असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये या बाबत एकमत झाल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. यावर आज (मंगळवार) दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून अधिकृत घोषणा होणार आहे.
