सॅमसंगचा झेड वन स्मार्टफोन भारतात येणार

tizen-z1
साऊथ कोरियन कंपनी सॅमसंग ने त्यांचा टायझन ऑपरेटिंग सिस्टीम असलेला झेड आणि झेड वन भारतीय बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून हा स्मार्टफोन १० डिसेंबरला लाँच केला जाईल असे सांगितले जात आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर तसा खुलासा केलेला नाही मात्र पत्रकार परिषदेत तसे जाहीर केले गेले आहे.

सॅमसंगच्या स्मार्टफोनसाठी आत्तापर्यंत अॅड्राईड ओएसचा वापर केला गेला आहे. आता मात्र टायझन ओएस वापर सुरू होत असून ही कंपनीची नवी सुरवात मानली जात आहे. हा फोन सुरवातीला रशियात लाँच करण्यात येणार होता पण तो केला गेलेला नाही. या स्मार्टफोनला ४.८ इंची डिस्प्ले सुपर अमोलेड एचडी स्क्रीनसह देण्यात आला आहे. १६ जीबीची इंटरनल मेमरी ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा आहे तसेच त्याचे वजन १३६ ग्रॅम इतके आहे

स्मार्टफोनला ८ मेगापिक्सलचा रिअर व २.१ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर,फिंगरप्रिंट स्कॅनर, मिनी मोड, क्विक शॉट, बेस्ट फोटो, ड्रामा, पॅनोरमा अशीही फिचर्स दिली गेली आहेत. फोनमध्ये हार्ट रेट सेन्सरही बसविला गेला आहे.

Leave a Comment