अखेर पार्सेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब

laxmikant
पणजी : पणजीमध्ये आज भाजपच्या आमदारांच्या बैठकीत लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नावावर गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे.

लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नावाचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांनी ठेवला होता. त्यावर सर्व आमदारांनी एकमत दिले.

त्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी केली. आज संध्याकाळी लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Leave a Comment