राष्ट्रवादी काँग्रेस सुरु केली भाजप सरकारची घेरेबंदी

pawar
पुणे- राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन यंदा कापसाचा हमीभाव राज्य सरकारने हजार ते दीड हजार रूपयांनी कमी केल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना भाजप सरकारने न्याय द्यावा अशी मागणी केली असून ऊस उत्पादकांनाही रास्त दर देऊन न्याय देण्याची भूमिका घ्यावी, असेही आव्हान पवार यांनी केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतक-यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकारला घेरण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत पवारांनी दिले आहेत.

आताच्या सरकारने मागील एक-दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कापसाचा हमीभाव खूपच कमी जाहीर केला असून हा दर अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. मागील काळात आमचे सरकार होते त्यापेक्षा हा दर सुमारे २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. यंदा सरासरी हजार ते दीड हजार रूपयांनी कापसाचे दर उतरले असल्यामुळे कापूस फेडरेशनने कापूस खरेदी करणार नसल्यामुळे सरकारने कापूस खरेदी करणे सुरु करावे. याचबरोबर नाफेडला अर्थसहाय्य करावे. साखरेचे दर यंदा खाली आले आहेत. असे असले तरी ऊस उत्पादकांना रास्त दर देऊन न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. नव्या सरकारने बाजार समित्या बरखास्त केल्या आहेत. त्याच्या निवडणुका लवकरात लवकर घेऊन लोकप्रतिनिधींच्या हाती बाजार समित्याचा कारभार सोपवावा असेही पवारांनी सांगितले.

Leave a Comment