
पंढरपूर – कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरातल्या पांडुरंगाची शासकीय पूजा उपमुख्यमंत्रिपदाची निवड न झाल्याने राज्याचे नवनिर्वाचित महसूल मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आली.
पांडुरंगाची शासकीय पूजा महसूल मंत्र्यांच्या हस्ते
खडसे यांच्यासह शासकीय पूजेचा मान सुरेश कुलकर्णी आणि वंदना कुलकर्णी या वारकरी दाम्पत्याला मिळाला. गेल्या ४० वर्षांपासून कुलकर्णी हे पंढरीची वार करीत आहेत. तसेच कार्तिकीची नित्यपूजा यंदा प्रथमच बडवे यांच्या ऐवजी विठ्ठल रूख्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या हस्ते करण्यात आली. तर समितीचे सदस्य जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते रूख्मिणीची पूजा झाली. यापूर्वी उत्त्पातांच्या हस्ते ही पूजा करण्यात येत होती. दरम्यान, कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात लाखो भाविक दाखल झाले आहेत.
