
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे दहा आमदार आज होणा-या शपथविधी सोहळयात मंत्रिपदाची शपथ घेणार असून यामध्ये आठ कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे.
आज भाजपाचे दहा आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर त्यांच्यासह भाजपा कोअर कमिटीचे सदस्य विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे तसेच चंद्रकांत पाटील, विष्णू सावरा आणि प्रकाश मेहता हे आमदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शिवाय विद्या ठाकूर आणि दिलीप कांबळे हे राज्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने शिवसेनेने या सोहळयावर बहिष्कार टाकला आहे.
