
टोकियो – जपानमध्ये एका महिला मंत्र्याला सरकारी तिजोरीतील ९४ हजार डॉलर्स सौंदर्य प्रसाधनांवर खर्च केल्याच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला आहे.
जपानच्या उद्योगमंत्री युको ओबुचींनी दिला राजीनामा
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मंत्रिमंडळात दोन महिलांना स्थान दिले होते. जास्तीत जास्त महिलांना संधी देण्याचे आबे यांचे प्रयत्न होते. मात्र सोमवारी आबे यांच्या मंत्रिमंडळातील दोन्ही महिला मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामे द्यावे लागले आहे. सोमवारी सकाळी आबे यांची भेट घेऊन जपानच्या उद्योगमंत्री युको ओबूची यांनी त्यांच्याकडे राजीनामा दिला असून सर्वात महत्त्वाच्या खात्याच्या जबाबदारी असलेल्या ओबुची यांनी सरकारी पैशांचा गैरवापर करत त्यातून सौंदर्यप्रसाधन आणि अन्य कामासाठी खर्च केल्याचे समोर आले होते. विरोधकांकडून टीका सुरु झाल्यावर ओबुची यांनी सोमवारी राजीनामा दिली.
