
मुंबई -अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची मुलगी गीता गवळीच्या गाडीवर भायखळा येथे हा हल्ला झाला असून ऐन मतदादिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरुण गवळीच्या मुलीवर हल्ला
आमदार राहिलेल्या अरुण गवळीची अखिल भारतीय सेना विधानसभा निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरली आहे. भायखळ मतदारसंघातन अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी ऐवजी त्यांची कन्या गीता गवळी यांनी निवडणुक लढवली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप गीता गवळीने केला आहे. याप्रकरणी गीता गवळीने भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
