
परभणी – परभणीतील एका राष्ट्रवादीच्या उमेदवारावर तसेच त्याच्या मुलावर मतदानाच्या दिवशीच गुन्हा दाखल झाला असून याबाबत तक्रार काँग्रेस उमेदवाराने दाखल केली होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
मधुसुदन केंद्रे असे गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव असून केंद्रे हे गंगाखेड मतदार संघातून निवडणुक लढवत आहेत. केंद्रे यांच्यासह त्यांचा मुलगा निखिलेश यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा मेसेज व्हॉट्स अॅपवर टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार रविकांत चौधरी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड पोलिस ठाण्यात केंद्रे पिता-पुत्रावर सायबर क्राईमचा गुन्हा दाखल झाला आहे.
