
काबूल – अफगाणिस्तानात आज एक आत्मघातकी स्फोट झाला असून, त्यात तीन नागरिक ठार झाले आहेत. तर अन्य सहाजण जखमी झाले आहेत. एका अधिका-याने सांगितले की, नांगरहार प्रांतातील गनी खिल जिल्ह्यात हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. एका आत्मघातकी हल्लेखोराने लष्करी टॅंकजवळ स्वतःचा स्फोट घडवला. मृतांमध्ये आत्मघातकी अतिरेकी आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर अन्य सहाजण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल कऱण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. अद्यापपर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
