तिस-या एकदिसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने पडला पाकचा फडशा

austrelia
अबु धाबी – ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला रोमांचित तिस-या एकदिवसीय सामन्यात एका धावेने मात देत, ३ सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली आहे. नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात दोन धावांची गरज होती आणि त्यांचे दोन गडी शिल्लक होते. श्वास थांबविणा-या या रोमांचक स्थितीत ऑस्ट्रेलियार्इ ग्लेन मॅक्सवेलने ५० व्या षटकात सोहेल तनवीर (१०) आणि मोहम्मद इरफानला (०) बाद करत संघाला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा अशद शफीक (५०) ने केल्या. या सामन्यात नेतृत्व करणारा आफ्रिदी केवळ सहा धावाच करू शकला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. अहमद शहजाद (२६) आणि सरफराज अहमद (३२) ने पहिल्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी केली. मध्यमफळीत शफीक आणि शोएब मकसूद (३४) ने देखील पाकिस्तान संघांच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, मोठी भागीदारी न झाल्यामुळे संघ सलग अंतरावर गडी गमावित होता. हेच संघाच्या पराभवाचे मोठे कारण ठरले. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन, जेम्स फॉल्कनर, ग्लने मॅक्सवेल आणि जेवियर डोहर्थीने दोन-दोन गडी गामविले. मिशेल स्टार्कला एक यश मिळाले. याआधी पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना ४९.१ षटकात केवळ २३१ धावांवर बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५६ आणि स्टीवन स्मिथने ७७ धावा केल्या. शानदार गोलंदाजी करणा-या मॅक्सवेलने देखील २० धावांचे योगदान दिले. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. पाकिस्तानकडून सोहेलने तीन आणि आफ्रिदीने दोन यश मिळविले.

Leave a Comment