भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे आवाहन

pankaja
मुंबई – महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा ही लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बाळगलेली इच्छा होती. येत्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बहुसंख्येने निवडून देवून ती इच्छा पूर्ण करणे हीच माझे दिवंगतबाबा गोपीनाथराव मुंडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून राज्यातील जनतेने सर्व मतदारसंघातून कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मुंडेसाहेबांना श्रद्धांजली वाहावी,असे कळकळीचे आवाहन मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांनी केले आहे.

पंकजा मुंडे यांनी सांगितले की, राज्यातील दीन-दलित,उपेक्षित,मागास आणि कष्टकरी तसेच शेतकरी,ऊस तोडणी कामगारांसह सर्व शेतमजूर आणि कामगार वर्गाचे तसेच ग्रामीण आणि शहरी जनतेचेप्रश्न तळमळीने मांडून त्यांची तड लावणाऱ्या मुंडे साहेबांना राज्यातील अकरा कोटी जनतेच्या हृदयात अढळ स्थान आहे. या सर्वांचा विकास हा त्यांचा आयुष्यभराचा ध्यास होता. मुंडे साहेबांचे सुरक्षित आणि समृद्धमहाराष्ट्राचे स्वप्न राज्यात भाजपचे संपूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाल्याशिवायसाकार होऊ शकणार नाही. राज्यातून अंडरवर्ल्ड संपवून राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी मुंडे साहेबांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्याच पद्धतीनेदहशतवाद कायमचा हद्दपारकरणे आणिमहिलांवरील अत्याचारांना मूठमाती देणे यासाठीही भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आवश्यक आहे.या सर्व पार्श्वभूमीवरराज्यातील जनतेने येत्या १५ तारखेसकमळाचेबटण दाबून लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करावी,असे माझे अतिशय कळकळीचे आवाहन आहे,असेही पंकजामुंडे-पालवे यांनी म्हटले आहे.