
श्रीहरीकोटा – इस्त्रोचा तिसरा दिशादर्शक उपग्रह ‘आयआरएनएसएस १ सी’ याचे प्रक्षेपण १६ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असून, त्याची उलटगणती आजपासून (१३ ऑक्टोबर) श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रातून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या धर्तीवर विभागीय नेव्हिगेशन प्रणाली विकसित करण्याच्या उद्देशाने इस्त्रो सात दिशादर्शक उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. त्यापैकी तिस-या उपग्रहाचे प्रक्षेपण काही तांत्रिक अडथळ्यांमुळे पुढे ढकलण्यात आले होते. ‘आयआरएनएसएस १ ए’ आणि ‘आयआरएनएसएस १ बी’ या उपग्रहांचे यापूर्वीच प्रक्षेपण करण्यात आले आहे.
आजपासून इस्त्रोच्य़ा दिशादर्शक उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलटगणती
इस्त्रोने सांगितले आहे की, या प्रक्षेपणासाठी ६७ तासांची उलटगणती १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी सुरू झाली आहे. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘पीएसएलव्ही सी २६’ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने प्रक्षेपण केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
