पैसे वाटपप्रकरणी शिवसेना उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

shivsena
ठाणे – ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रविंद्र फाटक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात पैसे वाटपप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या तक्रारीनंतर हा राबोडी पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पहाटे गोकुळनगर परिसरातील वक्रतुंड सोसायटी परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीन लाख रुपये वाटल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश जानकर यांनी केला आहे. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फाटक, कार्यकर्ते राजेंद्र फाटक, बाळा चिंदरकर, शैलेश सावंत आदी कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्यावर ५०६(२), १७१(३), ३२३ आणि ५०४ या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात खाजगी जागेत घुसून वस्तूंचा वापर केल्याची तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment