एचटीसीने केला १३ मेगापिक्सलचा स्मार्टफोन लॉन्च !

htc
न्यूयॉर्क – तायवानच्या एचटीसी कंपनीने हाय रिझोल्यूशन कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनच्या दोन्ही कॅमेऱ्यांनी आपण सेल्फी काढू शकाल. ‘एचटीसी डिझायर आय’ या स्मार्टफोनमध्ये दोन्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरे १३ मेगापिक्सलचे आहेत. डिझायर आय फोटो, व्हिडिओ आणि सेल्फी प्रेमींसाठी खास बनवण्यात आला आहे. हा नवा फोन यूएसमध्ये AT&T द्वारे विकला जाणार आहे. एचटीसीने वेगळ्या आकाराचा कॅमेरा देखील लॉन्च केला आहे. हा कॅमेरा एखाद्याच्या हातात सहज मावेल असा आहे. एचटीसी भविष्यात यू-ट्यूबच्या मदतीने लाईव्ह स्ट्रिमिंग कॅमेराही लॉन्च करण्याच्या विचारात आहे. जुलै-सप्टेंबर महिन्यात एचटीसीने २१ मिलियन डॉलर इतका नफा कमावला आहे.