अनिश गांधीने जागतिक ज्यूनियर बुद्धिबळ स्पर्धेत कार्तिकेयनला नमविले

chess
पुणे – जागतिक ज्यूनियर बुद्धिबळ स्पर्धेच्या येथे सुरु असलेल्या स्पर्धेत अनिश गांधी आणि मुरली कार्तिकेयन यांनी सुरुवातीच्या दोन फे-यांमध्ये आपआपल्या खेळाने भाग्य आजमावले आहे. मंगळवारी कोल्हापूरच्या गांधीने सफद सोंगट्या घेऊन हार पत्करली होती. मात्र, आज काळ्या सोंगट्या घेऊन खेळताना पहिल्या फेरीतच त्याने कार्तिकेयनला मात दिली. आपल्या कामगिरीबद्धल बालेताना गांधी म्हणाला की, तीन प्यादी सरकवताना मी चूका केल्या आणि आजचा खेळ त्यामुळे गुंतागुंतीचा झाला होता. आशियार्इ शालेय रौप्य पदकाचा २०११ मध्ये मानकरी असलेल्या गांधीने २०१३ मध्ये १७ वर्षाखालील राज्यस्तरीय विजेतेपद पटकाविले आहे.

त्याच्या पहिल्या सामन्यात स्वीडनच्या एफ एम लिनस जोहान्सन समोर त्याचा खेळ गडबडला होता. तामिळनाडूच्या कार्तिकेयनने त्याच्याच राज्यातील शिवा माधवनला मात देऊन विजयाची एक फेरी पूर्ण करण्याची औपचारिकता पार पाडली आहे. मंगळवारी झालेल्या स्पर्धेत त्याने बालचंद्र प्रसाद याला ६५ चालीत नमविले. या खेळात भारताचे सात खेळाडू सहभागी झाले आहेत ते खुल्या गटात आणि महिला गटात खेळणार आहेत. स्पर्धेत आघाडीवर रशियाचे वाल्दिमीर फेडोसीव राहिला असून, त्याने रो मानियाच्या बोगदान डेनियलडिका याला काळ्या सोंगट्यांनी खेळयाता नमविले.