धोनीने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले

dhoni
कोच्ची – वेस्टइंडिज विरूद्धचा पहिला एकदिवसीय सामना १२४ धावांनी गमविल्यानंतर भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघाच्या फलंदाजीला जबाबदार ठरविले आहे. धोनीने सांगितले की, चांगल्या खेळपट्टीवर आमचे फलंदाज धावा करण्यास अपयशी ठरले. तसेच वेस्टइंडिजचा संघ खूप मजबूत आहे, असेही तो म्हणाला. धोनी पुढे म्हणाला की, नेहरू स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त होती. त्यावर ३२२ धावांचे लक्ष्य सहज गाठले जाऊ शकलो असतो, परंतु त्यात आम्ही अपयशी ठरलो. भारताला पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर धोनीने सांगितले की, अखेरच्या काही षटकात आम्ही चांगली गोलंदाजी केली, ज्यामुळे वेस्टइंडिजच्या धावा अधिक होऊ शकल्या नाहीत. त्यांची फलंदाजी उत्तम होती. त्यांना रोखण्यासाठी अखेरच्या षटकात आमच्या गोलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. पाहुणा संघ वेस्टइंडिजबाबत विचारण्यात आल्यावर धोनी म्हणाला की, त्यांची फलंदाजी खरच उत्तम होती. त्यांच्याकडे फिरकीपटू, गोलंदाज आणि चांगले फलंदाज आहेत. कैरेबियन खेळाडूंचा यंदाचा संघ उत्तम आहे, असेही तो पुढे म्हणाला.

Leave a Comment