मोदींना पडला आहे पंतप्रधानांच्या कर्तव्यांचा विसर – शरद पवार

sharad-pawar1
वर्धा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान असलेले मोदी स्वतःचे काम सोडून निवडणूक प्रचारात फिरत असल्याबद्दल टिका केली आहे. मोदींना आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे, अशी टिका करून पवार म्हणाले की, पाकिस्तान सीमेवर तणाव असताना मोदी यांनी त्या विषयावर लक्ष द्यायला हवे. मात्र, मोदी स्वतःच्या पक्षाला महाराष्ट्रात सत्ता कशी मिळेल या चिंतेत फिरताना दिसत आहेत. तीन महिन्यांपूर्वी अच्छे दिनचा नारा देणार्‍या मोदींवर टिका करताना पवार म्हणाले की, सत्तेवर आल्यानंतर मात्र, त्यांच्या घोषणा बदलल्या आहेत. उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणूकींमुळे भाजपला आता बुरे दिन सुरु हो गये है असे म्हणायचे वेळ आली आहे आणि आता हेच वाक्य ते राज्यातील निवडणूकींनंतर म्हणणार आहेत, असे पवार म्हणाले. मोदींच्या गुजरातमध्ये देखील शेतकरी आत्महत्या होतात, असे म्हणून पवार म्हणाले की, त्या आत्महत्या थांबविण्यासाठी मोदींनी काय केले ते सांगावे.