कोकण रेल्वेवर मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतूक ठप्प !

train
रत्नागिरी – कोकण रेल्वेमार्गावरील चिपळूण-खेर्डीनजीक मालगाडीचे १२ डबे घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. परिणामी कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. चिपळूण-खेर्डी नजीकच्या ओव्हर ब्रीजजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन-तीन बोगी रूळापासून ५० ते ६० फूट लांबपर्यत घसरत गेल्या. या मालगाडीतून मुंबईला गहू आणला जात होता. त्यामुळे कोकणात सुट्टीसाठी गेलेल्या चाकरमान्यांचा पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. दरम्यान दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, सीएसटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर यांसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस यांसह अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

Leave a Comment