‘स्वच्छ भारत अभियाना’साठी सचिनने उचलला हातात झाडू!

sachin
मुंबर्इ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त लिटिल मास्टर ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर सहभागी झाला आहे. या अभियानातील ९ प्रतिष्ठित नागरिकांमध्ये स्वच्छता करण्यासाठी सचिन झाडू घेऊन भल्या पहाटे रस्त्यावर उतरला होता. आपल्या फेसबुक पेजवर त्याने याबाबतचे छायाचित्र प्रदर्शित केले आहे. हे अभियान पुढे घेऊन जाताना त्याने आपल्या मित्रांचा एक संघ तयार केला आणि सकाळी ४.३० वाजता बाहेर पडून त्याने साफसफार्इ केली. त्यांनी झाडू मारला आणि कचरा देखील उचलला. फेसबुकवर विडियो पोस्ट करून त्याने म्हटले आहे की, पंतप्रधानांनी दिलेल्या महत्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’चे नेतृत्व करण्यास तो सज्ज झाला आहे. राज्यसभेचा सदस्य असलेल्या सचिनने म्हटले आहे की, माझ्या मित्रांना जेव्हा पंतप्रधानांनी या योजनेत मला नेतृत्व दिले आहे, हे समजले त्यावेळी त्यांनी स्वत:हून मला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. ही तर केवळ सुरुवात आहे. आणखी लोक यात सहभागी होत राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment