
लातूर – निवडणूक काळात पैसे आणि मद्य वाहतुकीवर नजर ठेवली जात आहे. ही प्रक्रिया आणखी कडक आणि गतीमान करण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक राजा भट्टाचार्य यांनी दिल्या आहेत. मतदारसंघातील सर्वच गावात आणि वस्त्यातून या आधीच ही यंत्रणा कामाला लागली आहे. उत्पादन शुल्क विभागाची पथके मद्य विक्री दुकानांची दैनंदिन तपासणी करीत आहेत. बँकातून एक लाखापेक्षा अधिक रकमेचे व्यवहारही तपासले जात आहेत. संशयास्पद व्यवहार निवडणूक निरिक्षक आणि आयकर विभागाच्या नजरेस आणून दिले जात आहेत. सर्व चेकपोस्टवर संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.
