युती तुटण्यावर शरद पवारांनी सोडले मौन

sharad-pawar
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा-सेना युती तुटण्याशी आमचा संबंध नसल्याचे स्पषटीकरण पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिले असून निवडणुकीनंतर काँग्रेसशी आघाडी करण्याचा आता विचार नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी सिंचन घोटाळयावर होणा-या टीकेचा समाचार घेत पवार म्हणाले, राज्यात ३० हजार कोटी सिंचनाचा खर्च झाला असताना ७० हजार कोटींचा घोटाळा कसा झाला ? राज्यात प्रकल्पांना विलंब झाला मान्य आहे. पण मग धरणे कशी उभी राहिली. केवळ अर्धा टक्केच सिंचन वाढले, असे विधान करणे हे वास्तवाला धरून नाही. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचेही अमेरिकेत भव्य स्वागत होत असे. त्यांना आदर मिळत असे. पण त्यांनी त्याचं मार्केटिंग केलं नाही, अशी मोदींवर अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी यावेळी केली.