
मुंबई – भारतीय जनता पक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे प्रवेश करणार असून विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच कदम यांच्या जाण्यामुळे मनसेला मोठा धक्का बसणार आहे. घाटकोपर पश्चिमचे आमदार असलेले राम कदम आज संध्याकाळी पुण्यात भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत.
इंजिनाचा एक डबा सुटला; आमदार राम कदम भाजपात
गेल्या काही दिवसांपासून राम कदम हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
