टोकनाक्यावरील कर्मचा-याला नेत्याच्या अंगरक्षकाकडून मारहाण

toll-plaza
मुंबई : टोलनाक्यावरील कर्मचा-याला ठाण्यातील खासदाराच्या अंगरक्षकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

काल सायंकाळी एक इनोवा मोटार मुंब्रा-खारेगाव टोलनाक्यावर आली असता कर्मचा-याने टोल भरण्यासाठी मोटारीला इशारा केला. त्यानंतर मोटारीतून उतरलेल्या एका पोलीस अंगरक्षकाने कोणतीही विचारपूस न करता, कर्मचा-याची काहीही चुक नसताना त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. हा अंगरक्षक ठाण्यातील एका खासदाराचा असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसून, कर्मचा-याला मारहाण करणा-या अंगरक्षकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या घटनेचा सर्व थरातून निषेध करण्यात येत आहे. त्याचबरोबर टोकनाक्यावर गुंडगिरी करणाऱया अंगरक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment