
अलिबाग – उरणजवळच्या मोरापाडा येथे मुंबईतील नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले असून दोन वैमानिकासह चार जण या अपघातात जखमी झाले.
अलिबागजवळ कोसळले नौदलाचे हेलिकॉप्टर
मोरापाडा येथे सकाळी सव्वादहाच्या सुमारास हेलिकॉप्टर लँडींग होत असताना हा अपघात झाल्याचे नौदलातर्फे सांगण्यात आले. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले.
मात्र कोणतेही नागरी नुकसान झाले नसल्याचे नौदलाच्या अधिका-याने सांगितले. हा अपघात का झाला, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
