राज ठाकरे यांच्या नावे बनावट फेसबुक खाते

raj-thackary
मुंबई – मनसे कार्यकर्त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने फेसबुक, ट्विटरवरील बनावट अकाउंटवर कारवाई करण्याची मागणी केली असून यावर अद्याप पोलिसांनी कारवाई केली नाही, असे मनसे मीडिया संयोजक सचिन मोरे म्हणाले. सोशल नेटवर्किंग साइटवर मनसे अध्यक्षांच्या नावाने बनावट खाते उघडणारी व्यक्ती स्वत: राज ठाकरे असल्याचा भ्रम तयार करत असल्याची माहिती मोरे यांनी दिली.

आक्षेपार्ह टि्वटसह फेसबुक व टि्वटवर ही व्यक्ती वादग्रस्त पोस्टही टाकत असल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीला तत्काळ अटक करून बनावट खाती बंद करण्याची मागणी मनसेने केली आहे. या आधी २०१२ मध्ये राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी यांच्या नावानेही सोशल नेटवर्किंग साइटवर खोटी खाती उघडण्यात आली होती. तेव्हा पोलिसांनी तत्काळ ती खाती बंद पाडली होती.

Leave a Comment