
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता धनकवडे यांचीपुण्याच्या महापौरपदी, तर काँग्रेसच्या आबा बागुल यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
दत्ता धनकवडे झाले पुण्याचे प्रथम नागरिक
आज महापालिका भवनात महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक पार पडली. संख्याबळ पाहता राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात होता. महापौरपदाच्या निवडणूकीत दत्ता धनकवडे यांनी भाजपाच्या योगेश टिळेकर यांचा पराभव केला. धनकवडे यांना ८३, तर टिळेकर यांना ४३ मते पडली. उपमहापौरपदाच्या निवडणूकीत काँग्रेसच्या आबा बागुल यांनी युतीच्या भरत चौधरी यांचा पराभव केला.
