सात अपक्ष आमदारांचे राष्ट्रवादीत इनकमिंग

ncp
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गळती लागलेल्या राष्ट्रवादीमध्येही इनकमिंग सुरू झाल्याचे चित्र दिसत असून सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज पाच अपक्ष आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत. यात यात मानसिंह राव नाईक – शिरळा, बाळासाहेब पाटील – उत्तर कराड, रमेश थोरात – दौंड, आबासाहेब पाटील – अहमदपुर, सुरेश देशमुख – वर्धा, शरद गावित – नवापुर, कृषिभूषण साहेबराव पाटील – अमळनेर यांचा समावेश आहे.

यांपैकी बहुतांश आमदार आधीपासूनच राष्ट्रवादीशी संलग्न होते. मात्र, आज ते अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहेत. नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक लक्ष्मण जगताप शेकापच्या तिकीटावर लढले होते. मात्र, आता ते स्वगृही परतण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चार अपक्ष आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. त्यानंतर आता आज राज्याच्या विविध भागातील सात अपक्ष आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजप सेनेसोबत राष्ट्रवादीतही इनकमिंग सुरू असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment