
मुंबई – गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी डी.जी.वंझारा यांना जामीन मंजूर केला.
वंझारा यांना सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी जामीन
वंजारा गेल्या सात वर्षांपासून सोहराबुद्दीन शेख, इशरत जहॉं, कौसरबी आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणात तुरुंगात बंद असून त्यांनी अनेकवेळा जामीनासाठी अर्ज केला मात्र वारंवार तो फेटाळण्यात आला. अखेर आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात जरी त्यांना जामीन मंजूर झाला असला तरी मात्र इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात ते आरोपी असल्याने सध्या तरी त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे.
