नवनिर्वाचित महापौरांचा लाल दिवा काढण्यास नकार

snehal-amberkar
मुंबई – मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापौरांच्या गाडीवरील लाल दिवा काढण्यास सपशेल नकार दिला आहे.

‘मुख्यमंत्रीपदाइतकेच महापौर पद हे महत्त्वाचे असल्यामुळे महापौरांच्या गाडीवर लाल दिवा लावण्याची परवानगी दिली गेली पाहिजे. जर मुख्यमंत्री लाल दिव्यांची गाडी वापरत असल्यास महापौरांनाही तो अधिकार दिला गेला पाहिजे. जेव्हा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मुंबईस भेट देण्यासाठी येतात त्यावेळी महापौर लोकांचे प्रतिनिधित्व करत असतात, असे आंबेकर यावेळी म्हणाल्या.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी संविधानाचेही काही नियम आहेत. सर्वांनी नियमाचे पालन केले पाहिजे, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आंबेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. याआधी ४ एप्रिल २०१४ रोजी राज्याच्या गृहखात्याने नव्याने अधिसूचना काढून ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील महापालिकेच्या महापौरांना लाल दिव्याऐवजी अंबर दिवा लावण्याचे निर्देश दिले होते. राज्याच्या गृहविभागाकडून जारी झालेल्या अधिसूचनेबाबत माजी महापौर सुनील प्रभू यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून निषेध केला होता. महापौरांच्या गाडीवरील लाल दिवा कायम ठेवण्यात यावा असे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.

Leave a Comment