
वसई – मीरा भाईंदर येथील शिवसेनेच्या एका पदाधिकारी वासुदेव नांबियार याला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली असून वासुदेव हा शिवसेनेचे मीरा भाईंदर येथील माजी उप जिल्हा प्रमुख आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला बलात्कार प्रकरणी अटक
नांबियार याने मीरारोड येथील मीरागावठण भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. पीडीत मुलगी ही इयत्ता नववीची विद्यार्थीनी आहे.
या मुलीला आपल्या घरी बोलावून नंबीयार याने तिच्यावर बलात्कार केला असून, मागील नऊ महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. तसेच याची कुठे वाच्याता केल्यास तुला शाळेतून काढून टाकेण असे म्हणत तो तिला धमकावत होता.
ही मुलगी गर्भवती राहीली. त्याने या मुलीला अधिकच धमकावले. मात्र, या मुलीने सात महिन्यांच्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. नंबियार याला पोलिसांनी अटक केली आहे.
