दादांची दादागिरी

ajit-pawae
पुणे – एकीकडे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आदर करण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. तर, दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिक्षकांना थेट दमच भरला आहे. आम्हाला मत दिले तर तुमच्या समस्या सोडवू, असे म्हणत शिक्षकदिनी अजितदादांनी शिक्षकांना धमकी दिली आहे.

राज्य सरकारतर्फे पुण्यातील बालेवाडी येथे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले त्यावेळी अजित पवार बोलत होते.

यापूर्वी लोकसभा निवडणुकी दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या प्रचारावेळी अजित दादांनी मत दिले तरच समस्या सोडवू असे मतदारांना सांगीतले होते. आता पून्हा एकदा अजित पवारांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे.

Leave a Comment