स्टार फुटबॉलपटू नेयमारची ब्राझीलच्या कर्णधारपदी निवड

neymar
मियामी – अमेरिकेमध्ये कोलंबिया आणि इक्वाडोर विरुध्द होणा-या मैत्रीपूर्ण लढतीसाठी ब्राझील फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेयमारची निवड करण्यात आली आहे.

प्रशिक्षक डूंगा यांनी ही निवड फक्त दोन सामन्यांपुरती आहे की, दीर्घकालीन ते स्पष्ट केलेले नसून नेयमार जखमी कर्णधार थियागो सिल्वाची जागा घेणार आहे.

मियामीच्या सन लाईफ स्टेडियमवर आज रात्री ब्राझील आणि कोलंबियामध्ये सामना होणार आहे. या सामन्याने विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या आठवणी ताज्या होतील. विश्वचषकात स्वप्नवत घौडदौड करणा-या कोलंबियाला ब्राझीलने उपांत्यपूर्व फेरीत २-१ ने पराभूत केले होते.