वरिष्ठांवर बेस्ट कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला

best
मुंबई – शुक्रवारी सकाळी एका बस चालकाने बेस्टच्या मुंबई सेंट्रल बस डेपोमध्ये आपल्या वरिष्ठ अधिका-यांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून वरिष्ठ अधिका-यांबरोबर बस चालकाचा शिफ्टवरुन वाद झाला. या वादातून त्याने थेट वरिष्ठांवर कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर अटकेच्या भितीने या चालकाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्याचवेळी तेथे आलेल्या अन्य कर्मचा-यांनी या तिघांना तातडीने जवळच्या नायर रुग्णालयात दाखल केले. पोलिस या घटनेचा तपास करत असून, पोलिसांनी हल्ल्याचे कारण अद्याप सांगितलेले नाही.

Leave a Comment