आयएसआयएस लंडनमध्ये २६/११ प्रमाणे हल्ले करण्याची शक्यता

london
लंडन – इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी संघटनेत सामील झालेले ब्रिटीश जिहादी देशात परतून मूंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याप्रमाणे हल्ले करू शकतात असा इशारा बिटीश गुप्तचर यंत्रणा एमआय ५ ने दिला आहे. या संस्थेचे अधिकारी म्हणाले की आयएसआयएस जिहादी संघटना लंडन, बर्मिंगम आणि मॅन्चेस्टर येथील अनेक महत्त्वाच्या संस्था, इमारती लक्ष्य करू शकतात. हे अतिरेकी शिपिंग कंटेनर्समधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि विस्फोटके तस्करी करून ब्रिटनमध्ये आणत आहेत असेही एमआय ५ चे म्हणणे आहे.

गुप्तचर विभागाच्या इशार्‍यावर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी चिंता व्यक्त केली आहे तर दुसरीकडे सौदी राजा अब्दुल्ला यांनीही इस्लामिक स्टेटचे जिहादी अमेरिका आणि युरोपला निशाणा करण्यावर भर देत असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणतात या दहशतवाद्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले गेले नाही तर १ महिन्यात ते अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पोहोचू शकतील. त्यांना माणुसकीची भाषा समजत नाही तेव्हा त्याबाबत अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.

अमेरिकी सिनेटरनीही शेकडो अमेरिकन, ब्रिटीश व कॅनडातील युवा नागरिक सिरीया आणि इराकमध्ये इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांच्या तळावर जाऊन ट्रेनिंग घेत असल्याचे विधान केले आहे.