संशयित नक्षलवाद्याला पुण्यात अटक

bhelke
पुणे- पुणे दहशतवाद प्रतिबंधक विभाग पोलिसांनी चंद्रपूर येथील संशयित नक्षलवादी अरूण भानुदास भेलके याला सोमवारी सायंकाळी कासेवाडी भागात सापळा रचून अटक केली. भेलके देशभक्ती या युवा मंचाचा अध्यक्ष असून तो माओवादी सीपीआय नक्षलवादी संघटनांना तरूण भरतीसाठी मदत करतो असा पोलिसांना संशय आहे.

या विषयी अधिक माहिती देताना एटीएसचे वरीष्ठ अधिकारी भानुप्रताप बर्गे म्हणाले की एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांना भेलके पुण्यात आल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार आम्हाला ही माहिती देण्यात आली. भेकले कासेवाडीत आल्याची खबर मिळताच आम्ही सापळा रचून त्याला पकडले. तो अनेक नावांनी वावरत होता आणि गेल्या वर्षापासून पुण्यात कारवाया करत होता असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. तो मूळचा चंद्रपूरचा रहिवासी असून पुण्यात १८ ते २२ वयाच्या तरूणांच्या सतत संपर्कात होता असेही कळले आहे. कुशल नक्षली संघटना प्रमुखाशी त्याचे निकटचे संबंध असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याला पुणे पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचेही बर्गे यांनी सांगितले.

Leave a Comment