कौटुंबिक कारणास्तव चॅम्पियन्स लीग टी-२०तून वेट्टोरीची माघार

vettori
नवी दिल्ली – विख्यात फिरकीपटू डॅनियल वेट्टोरी याने चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेतून कौटुंबिक कारणास्तव माघार घेतली असून येत्या सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये भारतात ही स्पर्धा खेळली जाणार आहे. वेट्टोरीचे नाव नॉर्दन नाईट संघात आहे. हा संघ पात्रता फेरीत असून याच संघासोबत पात्रता फेरीत लाहोर लॉयन्स, मुंबई इंडियन्स आणि सदर्न एक्सप्रेस हे संघही आहेत.

वेट्टोरी याच्या जागेवर बदली खेळाडू मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पण बदली खेळाडू मिळेलच याचे कोणतेही आश्‍वासन याक्षणापर्यंत मिळालेले नाही. ऐनवेळी वेट्टोरीची माघार नॉर्दन नाईट संघासाठी डोकेदुखी ठरू शकते असे नॉर्दन डिस्ट्रिकचे मुख्य कार्यकारी पीटर रोच म्हणाले.

वेट्टोरी वगळता नॉर्दन नाईट संघात एकही अष्टपैलु खेळाडू नसल्यामुळे त्याच्या जागेवर बदली अष्टपैलू खेळाडू मिळणार कसा? असा सवालच कोरी ऍण्डरसन यांनी उपस्थित केला आहे.