
बगदाद : दहशतवाद्यांनी इराकच्या दियाला प्रांतातील एका मशिदीला लक्ष्य केले असून नमाज अत्ता करणारे ७० सुन्नी मुसलमान या दशहतवाद्यांच्या हल्ल्यात ठार झाले.
मशिदीवरील दहशतवादी हल्ल्यात ७० ठार
शुक्रवारी दियाला प्रांतातील इमाम वाईज मशिदीवर शिया पंथीय दहशतवाद्यांनी हल्ला केला. या वेळी मशिदीत नमाज पठणासाठी आलेल्या शेकडो निष्पाप शिया मुसलमानांवर दहशतवाद्यांनी बेधुंद गोळीबार केला. त्यात ७० जण ठार झाले. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी मशिदीबाहेर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या वाहनांचीही नासधूस केली.
